भातंबरे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
भातंबरे, दि. १३ जून : मातृभूमी प्रतिष्ठान संचलित भगवंत नेत्रालय यांच्या वतीने आज भातंबरे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. खुणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या शिबिरास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
शिबिरामध्ये नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक मार्गदर्शनही देण्यात आले. शिबिराचे आयोजन भातंबरे ग्रामस्थांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
यावेळी मातृभूमी प्रतिष्ठान संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. मधुकर डोईफोडे, प्रा. घळके सर, विजय केसरे सर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांच्या सहकार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. शिबिरात 150 रुग्णांची नोंद झाली व यामध्ये अंदाजे 45 cataract आढळून आले. या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध झाली असून ग्रामस्थांनी आयोजकांचे आभार मानले.