Ph: 9421584055

matrubhoomipratishthan14@gmail.com

मातृभूमी प्रतिष्ठान, शिवाजी नगर,पाटील प्लॉट, बार्शी,जि.सोलापूर ( महाराष्ट्र )

CLICK TO CALL

गावामध्ये निराश्रित,अपंग, वयोवृद्ध लोकांना दोन वेळचे जेवण मिळत नाही ही बाब प्रतिष्ठांनच्या पदाधिकार्‍यांच्या लक्षात आली म्हणून कमीत कमी पाच गावामध्ये अशी योजना राबविण्याचा निश्चय केला त्यानुसार खामगाव व सुर्डी या तीन गावामध्ये स्थानिक कार्यकर्त्या मार्फत अश्या लाभार्थीची यादी तयार करून त्याची योग्य ती छाननी करून लाभार्थीची निवड करण्यात आली असून या तीन गावामध्ये अनुक्रमे 22 व 18 एवढे लाभार्थी लाभ घेताहेत. त्यांना सकाळ, संध्याकाळ दोन भाज्या, भात, चपाती किंवा भाकरी असा आहार मोफत दिला जातो. एवढेच नाही  तर ज्यांना मध्यवर्ती ठिकाणी स्वयंपाक केला जातो त्याठिकाणावर येने शक्य नसल्यास जेवणाचा डबा घरपोच केला जातो. व अशी एखादी व्यक्ति गावामध्ये अन्ना वाचून उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जाते.

matrubhoomipratishthan00002 matrubhoomipratishthan00003

समाजातिल जो घटक त्याच्या गरिबीमुळे, परिस्थितिमुळे किंवा परिवरातील सदस्यांनी न सांभाळल्यामुळे उपाशी राहतो किंवा लोकांनी टाकलेल्या उष्टावळीवर आपला उदरनिर्वाह चालवतो, त्या समाजातील दुर्बल, निराधार,निराश्रित,अपंग, वयोवृद्ध घटकाला दोन वेळेसचे ताजे जेवण देण्याचा मातृभूमी प्रतिष्ठानने संकल्प केला व त्याला अमूर्तरुप देऊन आज तीन गावातील साधारणत: 54 मंडळी त्याचा लाभ घेत आहेत. बार्शी शहरामध्येही सदर योजना मोठ्या स्वरुपात सुरू आहे, साधारणत: 75 मंडळी त्याचा लाभ घेत आहेत.

matrubhoomipratishthan00004 matrubhoomipratishthan00005

matrubhoomipratishthan00006 matrubhoomipratishthan00007

matrubhoomipratishthan00008 matrubhoomipratishthan00009

matrubhoomipratishthan00001