मातृभूमी प्रतिष्ठान आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
राजा अंबरीषाच्या रक्षणार्थ श्री.भगवंताचे प्रागट्य बार्शी शहरात झाले. दृढभक्ति आणि त्याला धावून येणारी देवकृपा अर्थात बार्शी नगरीची ही कथा आपणा सर्वांना माहीत आहे.
ग्रामदैवत श्री.भगवंताची कृपा म्हणजे सुख, शांति आणि समाधान. आणि म्हणूनच आम्ही बार्शीकर वेगळेच.
मातृभूमी प्रतिष्ठान ही बार्शी तालुका पातळीवरती काम करणारी एक सेवाभावी संस्था आहे. बार्शी शहर आणि तालुक्यातील समाजकार्याची आवड असलेल्या, त्यासाठी पुरेसा वेळ देणार्याब, आणि प्रसंगी पदरमोड करणार्यात नररत्नांची ही संघटना आहे. या संघटणेमार्फत आम्ही ग्रामीण भागामध्ये विशेषत: जनतेच्या आरोग्यासाठी जे जे उत्तम काम करणे गरजेचे आहे ते ते करण्याचा आमचा मानस आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी अल्पदरात पुरवीने, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता याबद्दल लोकांमध्ये जागृती करणे, लहान मुलांसाठी खेळणी पुरविणे, व त्यांचे वरती मोफत औषधउपचार करणे तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लावा , वृक्ष जगवा ही मोहीम राबविणे, ग्राम स्वच्छता व मोफत आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णांना पुरेशी वैद्यकीय मदत करणे, ई. कामे केली जातात त्यासाठी प्रयोगिक तत्वावर आम्ही पाच गावांची निवड केलेली असून त्यापैकी चार गावांमध्ये वरील सर्व सोयी पुरविल्या गेल्या आहेत बाकी दहा गावामध्ये या योजनेचा आम्ही प्रचार केलेला असून लवकरच उरलेल्या गावामध्ये त्याची अम्मलबजावणी होऊ शकते. मात्र त्यासाठी लोक प्रतींनिधी , शासन व लोक सहभागाची गरज असते ती मिळविण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करीत असतो.