बार्शी शहरातील मातृभूमी प्रतिष्ठानने आपल्या समाजसेवेच्या उपक्रमात आणखी एका नवीन उपक्रमाची भर घातली आहे. गरजवंत लोकांसाठी मोफत डोळे तपासणी व मोफत डोळ्यांचे ऑपरेशन हा उपक्रम त्यांनी सुरु केला असून या उपक्रमाची माहिती मातृभूमी प्रतिष्ठानचे सचिव प्रतापराव जगदाळे व अध्यक्ष संतोषकाका ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. अभिजित आडसूळ, डॉ. मोहसीन पटेल, प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. किरण गाढवे, शहाजी फुरडे-पाटील आदी उपस्थित होते. मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने भगवंत नेत्रालय या नावाने सुसज्ज इमारत उभी करण्यात आली असून, या इमारतीत अत्याधुनिक पद्धतीने डोळे तपासणी व ऑपरेशन केले जाणार आहेत. या ठिकाणी नेत्ररोग तज्ञ म्हणून डॉ. अभिजित अडसूळ व डॉ. मोहसीन पटेल हे काम पाहणार आहेत. ही जागा नेत्रालयला
संतोषकाका ठोंबरे यांनी विनामोबदला दिली आहे. तसेच नेत्रालयाला लागणारी यंत्रसामुग्री ही नाव न सांगण्याच्या अटीवर दानशूर व्यक्तींनी दिली आहे. मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने मोफत गरजूंना जेवणाचे डबे पोहच केले जातात. बाहेर गावाहून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनाही मदत केली जाते. तसेच आधुनिक क्रीडांगणाचेही काम
प्रतिष्ठानच्यावतीने चालू आहे. भविष्यात बार्शी तालुक्यातील व शहरातील प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी सुरडी येथे नेत्र तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ व वृद्ध नागरिकांच्या डोळ्यांच्या समस्या व त्यावरील उपचारासाठी जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Matrubhumi Pratishthan
Bank of India Barshi
A/c number 071410110024849
IFSC CODE : BKID0000714